गणेश चतुर्थीनिमित्त अनेक मोठमोठ्या गणेश मंडळा आणि गावा गावात घरोघरी बसवणाऱ्या बाप्पासाठी आकर्षक असा देखावा साकारण्यात आलेला आहे. त्यात दारव्हेकर कुटुंबीयांनी आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्याचा देखावा साकारण्यात आलेला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामघोषात पालखी पंढरपूरात पायी रावाना करण्यात आलेल्या होत्या. तोच एक देखावा दारव्हेकर कुटुंबीयांनी आपल्या बाप्पासाठी साकारला आहे.
ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामघोषात पालखी पंढरपूरात पायी रावाना करण्यात आलेल्या होत्या. तोच एक देखावा दारव्हेकर कुटुंबीयांनी आपल्या बाप्पासाठी साकारला आहे. ज्यात त्यांनी अतिशय संदर अशी नागमोडी घाट दाखवली आहे त्यात संदर असे वारकरी देखील त्यांनी तयार केले आहेत. विठुरायाची प्रतिमा देखील बाप्पाच्या बाजूला पाहायला मिळत आहे. तसेच टाळ-मृदुंग, वैष्णवांचा मेळा आणि दिवे घाटातून जाणारी पालखी असा देखावा त्यांनी साकारलेला आहे.